Saturday 2 September 2017

दाह..

 इ. स. पूर्व ६००..

 {अश्मक राज्य- गोदेच्या कुशीत पोषित झालेले राज्य, हिंस्र श्वापदांपासून सुरक्षित,भक्कम लाकडाच्या इमारतीने
उभारलेले, धान्याचे कोठार, काळ्या मातीचे पठार म्हणून प्रसिद्ध.}

तो  निश्चल  होता, अग्नीच्या ज्वाळाही त्याला घाबरत असाव्यात कारण  स्मशानातील  ती  चहू  बाजूची  जळती  लाकडे  त्याचे  काही  एक   बिघडवू  शकत  नव्हती.
त्याची  ती  तपश्चर्या स्वयं  आदिनाथ  हि  खंडित  करू  शकत  नव्हते . करणार  तरी  कसेमुळीच  तो  कुठल्या  वरदानासाठी हि  तपश्चर्या  करीत  नव्हता.

एवढेच  नव्हे  तो  कोणाचे  स्मरण  करीत  होता  हे  हि  कोणाला  ठाऊक  नव्हतेत्याचा  असा  कोणी  गुरु  नव्हताच , एक  शेतकरी  कुटुंबात  जन्माला  आलेला  तो  अवघा  17 वर्षाचा  होता .
मोठं  मोठी  ज्योतिष  आणि पंडीत तर  हेच   विचार  करीत  होते  कि  ह्याचे  आराध्य  तरी  कोण  आहे  भगवान  श्री  विष्णू  कि  योगीराज  महादेव .

हा  स्मरण  तरी  कशासाठी  करीत  होता  आणि  त्याला  हवे  तरी  काय  होते .
अंगावर  राख  माखून  पद्मासनाध्ये  ह्याला  बसण्यास  तरी  कोणी  सांगितले .एका  आदिवासी जमातीत जन्माला आलेला तो तो  ज्याची  जन्मतिथी  हि  कोणाला ठाऊक नव्हती.

मग  ह्याचे  भविष्य  सांगणार  तरी  कसेहस्तरेखा  पाहाव्यात  तर  त्या  डोंगरावर जाणे निषिद्ध होते. पार्थिव शरीर हि पायथाशीच ठेवली जात  असत आणि पुढील परिवहन हे शैव साधू करीत असत, पार्थिव शरीरासोबत दान केलेले खाद्य पदार्थ हेच त्यांची उपजीविका.
हजारो  लोकांचा  समुदाय रोज त्या टेकडीच्या पायथ्याशी जमा असायचा, एरवी निषिद्ध समजली जाणारी ती स्मशानभूमीची जागा एखाद्या मंदिरासारखी भासत होती.


मोठं  मोठी  पंडितज्योतिषी, ऋषी, महर्षी, मुनी  ह्यांची  पंडाल हि डोंगराच्या सभोवताली गर्दी करत होती.
ती सांज वेळ होती, सूर्य अगदी मावळतीला जात होता काही धूसर लाल किरणे वगळता अक्षरशः काळोखाच्या शिवाय काहीही दिसत नव्हतेपाखरांची किलबिल जणू थांबली होती , वाराही जणू आवाज न करता वाहत होता झाडी झुडपेही अगदी स्तब्ध झाली होती जणू काही हृदयाची स्पंदन ऐकू येणारी शांतता तिथे पसरली होती, जो तो सावधान मुद्रेत वंदनाच्या स्तिथीत हात जोडून डोंगराच्या माथ्याकडे डोळे  रोखून होताजणू काही डोळ्यांची पूर्ण क्षमता पणाला लागली होती आणि चित्त एकाग्रतेने एकटवून गेले होते.

माथ्यावरचा तो ५०  हात  रुंद  आणि  १००  हात उंच  असा   शिलालेख धूसर होत चालला होता.
आणि त्या महत्वपूर्ण क्षणी सूर्यास्ताची ती शेवटची किरणे त्या शिलालेखावर चमकली, आणि त्याबरोबर त्याच्या त्या पद्मासनात विराजमान असलेल्या विराट परछायेचे  दर्शन प्रकट झाले.
तो पश्चिममुखी विराजमान होता आणि सूर्यास्ताची ती मावळती किरणे त्याची प्रतिमा अनेक पटीने मोठी करून त्या शिलालेखावर प्रदर्शित करीत होती.त्याची ती पर्वताप्रमाणे अचल प्रतिमा , ती शून्य अवस्था आणि ती एकाग्र मुद्रा. किती अनोखे होते हे दृश्य, ना भूतो ना भविष्यती.
त्याच्या त्या निश्चल मुद्रेला अभिवादन करत तो हजारोंचा जनसमुदाय जमिनीवर गुढगे टेकवून त्याला अर्धांग दंडवत घालत होता.

जनसमुदायाच्या  कुठला  वादविवाद  किंवा  तर्क  वितर्क  नव्हता , जणू  हा   विषयच  त्यांच्या  कल्पनाशक्तीच्या  पलीकडे  होता . अगदी  शांत  मानाने  आलेला  तो  समुदाय  तसाच  अगदी  शांत  मानाने  तिथून  निघून  जात  होता .

पंडित  ज्योतिष  हि  कोणी  फार  ह्या  विषयावर उघड टिप्पणी  देत नसत त्यांचा चर्चेचा विषय म्हणजे ह्या मुलाचे बालपण.
काही समजदार आदिवासी त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करीत होते. बालपणापासूनच  तो त्याच्या विलक्षण प्रश्नांसाठी पूर्ण जमातीत प्रचलित होता. आदिवासी सांगत होते --


झाडांची  पाने  हिरवीच  का  असतात ? सूर्य  हा  पूर्वेलाच   का  उगवतो ? सावली  हि  नेहमी  काळीच  का  असते?अशी अनेक प्रश्ने तो वयाच्या चौथ्या वर्षीच त्याच्या तुटक बोबडया शब्दांत विचारायचा.

आपण  श्वास  कशासाठी  घेतो ? स्वप्ने  हि  कशी  आणि  का  पडतात ? पाणी हे कसे निर्माण होते ? वाघ  हा  शाकाहारी  का  नाही  होऊ  शकत अशी प्रश्ने तो सातव्या आठव्या वर्षी विचारायला लागला.
धनाचा  लोभ  करू  नयेइंद्रियतृप्तीचा  लोभ करू  नयेमग  जगण्याचा  लोभ  तरी  का  करावामुळात  जगणेच  का  आवश्यक  आहे असे  कठीण  प्रश्न  त्याला वयाच्या बाराव्या वर्षी पडू लागली.


ध्येयनिष्ठा  आपणच  का  असावे, इतर  पशु  आणि  पक्षी  हे  पण  ध्येयनिष्ठा  असतात  का ? आपण  मनुष्य  का  स्वतःला  इतर  पशूपेक्षा  वेगळे  मानतो. मनुष्य  हा  इतर  पशु  पेक्षा समजदार आहे  तर  का  तो  मुर्खासारखे  युद्ध करत  असतो, तारे  हे  का  चमकतात  त्याच्यात  युद्ध  कसे नाही  होतनियमित  मार्गाने  ते  किती  सहज  जीवन  जगतात, त्याप्रमाणे आपणही  का  जगू  शकत नाही ? 
आसपासच्या गावात जाऊन दिवसभर शेतात काबाड कष्ट करणारी ती भाबडी आदिवासी त्याच्या अशा प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ असत.

त्याला बंद  भिंतीत रहाणे आवडत  नसतत्याला  खुल्या  मैदानावर  हिरव्यागार  गवतात रहायला  आवडत असे ,त्याला  चांदणे  बघत  झोपायला  आवडत  असे, त्याला  सकाळ  फार  प्रिय  होती.
शिजवलेले  अन्न  त्याला  आवडत  नव्हते ,फळे  तो  आनंदाने  ग्रहण करीत  असे .
त्याचे  आचरण  आणि  विचारानं  हे  अगदी  भिन्न  होतेत्याचा  तो  कठोर  तप  कशासाठी  म्हणून  सांगता  येत  नव्हता , पण  त्याचा  तो  दाह  हा  अग्नीच्या  लपटाप्रमाणे  भासत  होता.
कुठल्यातरी सुंदर युवतीच्या प्रेमात तो पडला असावा आणि प्रेम भंग झाला असावा असा काही जीव तो वाटत नव्हता. तो प्रेमवेडा तर नक्कीच नव्हता. असेलही कदाचित... पण त्याचा प्रेमाचा अर्थ हा समजण्यास कठीण होता.
आज  त्याच्या  ह्या  कठोर  तपश्चर्येला   एकशे  एक  दिवस  पूर्ण  होत  आली  होती , कोणास  ठाऊक  कि  तो  कुठल्या  धामात  जाणार , धामात जाणार  कि  नाही  हे  हि  अनभिज्ञ  होते .
तो  ध्येयवादी  नव्हता , तो  निराश  हि  नव्हता , तो  क्रोधीत हि  नव्हता  नि  लोभीत  हि  नव्हता , तो  जखमी  होता  आणि  त्याची  जखम ही  इतक्या  खोलवर  होती  कि त्या  काळोखात  डोकावण्याची  कल्पना  हि  कोणी  करू  शकत  नसे.

इतके कसे हे तीव्र प्रेम आणि इतका कसला हा तीव्र दाह. भंग झालेले त्याचे मन, प्रियकराचे मन  प्रेमिकेच्या विरहाने वेडपिसाट व्हावे  ह्या हि पेक्षा अधिक छिन्न विछिन्न झाले होते. रक्ताने माखलेले त्याचे ते हृदयाचे घाव, आईचे विखुरलेले  हृदय  तान्ह्या बाळाच्या मृत्यूचा जेवढा शोक करणार नाही, त्याहीपेक्षा  कितीतरी अधिक शोकग्रस्त होते.
त्याचा तो दाह कोणाच्याही संवेदनक्षमतेच्या आवाक्याबाहेर होता, जगाच्या पाठीवरचा कुठलाही  मनुष्य मग  तो कितीही विद्वान असो  तपस्वी असो वा योगी; त्याची  संवेदना हि आनाकलनीय होती.
मरणोत्तर ज्वलंत पीडा देणारा त्याचा तो अघोरी दाह एका विलक्षण स्तरावर जाऊन पोचला होता.
कदाचित  तो  ईश्वर  होता , तो अवतारी होता, कदाचित मनुष्य जन्माला आल्याने स्वतःचे ईश्वरपण विसरला होता.
कदाचित त्याचे हे प्रेम होते , त्याच्या ह्या जीव सृष्टीवर, निसर्गावर. असेलही कदाचित कारण इतका सुरेख आणि सुंदर हा निसर्ग असाच थोडी बनला असेल ?
युगायुगाचा त्याचा तो तप असेल, त्याचे ते कष्ट असतील आणि ते स्वप्न.
कदाचित  स्वतःच  बनवलेला मनुष्य आणि त्याची वर्तवणूक पाहून तो  विस्कळीत  झाला  होता .
कोणास ठाऊक अशी काय घोर चूक मनुष्य करीत होता किंबुना भविष्यात करणार होता  ज्याचा दाह हा आज ह्या टेकडीवर जिवंत ज्वाला उफाळू पाहत  होता.

आज सूर्यास्ताबरोबर  त्याची  ती  शेवटची  प्रतिमा  उमटणार होती, जणू सारी सृष्टी त्याला आज प्रणाम करीत होती,   सूर्यास्ताबरोबर त्याने अखेरचा मावळतीचा श्वास घेतला.
मागील १०१ दिवसापासून  मुसमुसणाऱ्या वाऱ्याने आज टाहो फोडला होताशिलालेखावर प्रचंड दारार पडलीत्याने  देह  त्यागला  होता  आणि  वाळलेला  पाचोळा  मातीत  मिसळावा  त्याप्रमाणे  त्याचा  तो  रक्तहीन  देह मातीत मिसळून  गेला, वादळाने टेकडीवर थैमान घातला होता, आकाशात शेकडो हात उंच मातीचा लोट उसळला होता, काही एक क्षणाच्या थैमानानंतर जणू वादळाचे चित्त भानावर आले. हळू हळू वाऱ्याचा  जोर कमी होऊ लागला, हवेतील धूलिकण परत जमिनीवर स्थिरावत होते. स्मशानातील राखेसकट वादळाने त्याचा देह उधळून लावला होता.

कोणास ठाऊक  तो  कुठे  गेला  पण  त्याचा  तो  तडपता  दाह मात्र इथेच ह्या पृथ्वीतलावर राहिला.



कदाचित प्रत्येक  जीवात्मा  त्या  दाहाचा  अनुभव  क्षणा   क्षणाला  घेत  असतो, म्हणूनच  कदाचित  आजही  मनुष्याला  आनंदाच्या आसवांपेक्षा  दुःखाची  ती  आठवणींची  आसवं   जास्त  प्रिय  वाटतात.
मनुष्य  हा  आनंदाच्या  नव्हे  तर  अशाच  ह्या  दुःखाच्या  शोधात  असतो  जो  नकळत  त्याला  नम्र  बनवतो , जो  त्याला  सुज्ञ   बनवतो   त्याला त्याच्या चुकांची नेहमी जाणीव करून देतो.
हा  निरंतर  पच्छातापमनुष्याला  प्रगतिशील  बनवतो  आणि  त्याला सतत भान करून  देतो 
कि  ह्या  ब्रम्हन्डातील  प्रत्येक  गोष्ट   हि  आदरणीय  आहे  आणि  त्या   आदर  आणि  सन्मानाची  प्रत्येक  क्षणी  जाणीव  बाळगणे  हेच  खरे  प्रायश्चित  आहे . हेच खरे प्रायश्चित आहे...
.



1 comment: