Thursday 11 June 2015

मृत्युञ्जयता : एक अघटीत आपत्ती (II)

…………………………………………..2…………………………………………………

प्रात:काळापासून देवी यामिच्या महालात लगभग सुरु होती. संपूर्ण महाल हा आपल्या लाडक्या राणीसाठी सजला होता. दुध आणि चंदनाचा अभिषेक यामिला घालण्यात आला तिची कांती सोन्याहून पिवळी वाटत होतीतिच्या सखी, दासी इथून पुढे तिच्या सोबत राहणार नव्हत्या, तिची ती स्त्रीसुलभ छाया  वियोगाने खिन्न झाली होती.ब्रम्हचा आदेश म्हणजे आपल्यासाठी वरदानच आहे असा कटच तिने स्वता:शी बांधला होता. स्वत: प्रभू रामाने वनवास हा भोगलाच होता, मी तर त्यांची एक हीन दासी आहे, मी हा नरकवास भोगेनच.
सखींनी आणलेला खास युद्धाचा वज्रकवच तिच्या अंगावर चढवण्यात आला. मंद पावलाने ती महालच्या वेदीत आली,  हजारोंचा जनसमुदाय तिला निरोप देण्यासाठी जमा झाला .
होता
सूर्योदयाची वेळही जवळ आली होती, सुर्य किरणांच्या त्या तांबूस प्रकाशामध्ये तिचे शरीर एकाकी लखलखत होते.
"प्रणाम पिताश्री" तिने कमरेत वाकून सूर्याला आदरपूर्वक नमस्कार केला. तिची कांती त्या तांबूस प्रकाशात आणखीनच चमकत  होती, जणू ती किरणेतिला मायेचा आशीर्वादाच देत आहेत.
तिच्या छातीवरील जाडजूड कवचामुळे तिची कंबर अधिकच नाजूक वाटत होती. त्या योध्याच्या पेहराव्यात  तिची सुंदरता किंचितही कमी झाली नव्हती. तिच्या डाव्या हातावरील बाजुदंड हा तिच्यातली वीरांगना प्रकट करीत होता.
तिच्या त्या अवजड पेहरावामुळे तिच्या कपाळावर हलकेच घाम आला होतात्यामुळे तिचा चेहरा आणखीनच तजेलदार दिसत होता.

श्वेतध्वज फडकावत एक  पांढराशुभ्र  रथ आकाशातून खाले उतरला, तिने पुन्हा कमरेत वाकून त्या पवित्र रथाला नमस्कार केला. चतुर्भुज असलेला एक विष्णूदूत त्या रथाचे सारथ्य करत होता.हातातील दंड पेलत ती त्या रथामध्ये बसली, पुन्हा एकदा तिने सर्वांचा शेवटचा  निरोप घेतला, तिचा कंठ अगदी दाटून आला होता, पण हि वेळ अश्रू वाहण्याची नव्हती. पुढच्या क्षणी ते चार पांढरेशुभ्र घोडे तुफान वेगाने आकाशात झेपावले, आणि काही क्षणाततो रथ दिसेनासा झाला.
                                                  ................ .....................
 स्वर्गात आज अगदी ब्रम्हमुहुर्तावर जीवथला   शाही स्नान घालण्यात आले होते. शाही थाटात सजवण्यात आले होते. पाठीवर काळ्या रंगाचा मधोमध गोलाकार रेश्मी कापड परिधान करण्यात आला होता. पायावर नक्षी, नखावर सोन्याची परत, आणि पोटाखालील कवचाला चांदीचा मुलामा देण्यात आला होता. चेहऱ्यावर विविध अलंकार चढवण्यात आले होतेइंद्राच्या हत्तीप्रमाणे त्याचा थाट करण्यात आला होता. चतुर्गतच्या पाठीवर सिंहाची कातडी  परिधान करण्यात आली होती, पायात भक्कम वाळा घालण्यात आल्या होत्या, तो काही शाही पोशाखात नव्हता, पण योद्ध्याला साजेल आणि उपयोगी पडेल असाच तो पोशाख होता.
पहाटेची लघबघ चालू होती, शेकडो ब्राम्हण महायज्ञाच्या तयारीत गुंतले होते. सूर्याची तांबूस किरणे त्या मोकळ्या हिरव्यागार बगीच्यात पडत होती, बगीच्यातली विविध रंगाच्या कळ्या  त्या कोवळ्या प्रकाशात उमलू पाहत होत्या. फुलफाखारांची चलबिचल चालू होती, तो बगिच्या भव्य दिव्य आणि अगदी सुंदर भासत होताचतुर्गत निसर्गाचे ते अकल्पित सौंदर्य आज प्रथमच पाहत होताकाहीही झाले तरी शेवटी तो  कुबेराचा बगीचा होता.
अत्यंत रूपवान  अप्सरा फुले ,फळे आणि इतर साहित्य यज्ञासाठी जमवत होत्या. त्यांच्या अंगावरचे सुवासिक अत्तर हे ते निघून गेल्यानंतर हि दीर्घकाळ हवेत दरवळत होता, सुंगंधी धूप पेटवण्यात आल्या होत्या, कुठल्या एका कोपऱ्यात काही पवित्र आणि शुद्ध मनुष्य आत्मा श्री हरीचे  मधुर  कीर्तन गात होत्या . , अगदी भेभान होऊनते कीर्तन करीत होते. कुबेराचे काही दास केळ्याची पाने सजवण्यात गुंग झाली होती. चतुर्गत आणि जीवथला भव्य यज्ञाच्या पुढील उजव्या कोपऱ्यात थांबवण्यात आले होतेतेथील श्रेष्ट ब्राम्हण लोकांसाठी तर तो असून नसल्या सारखा होता. काही ब्राम्हण जीवथकडे इशारा करून काहीतरी बोलत होते. त्यांना जिवथचे भर मधात असणे बहुदा धोकेदायक वाटत होते.   
जीवथहि थोडा बिथरलेला होता, इतके लोक प्रथमच पाहत होताचातुर्गतने हलक्या हाताने त्याला थोपविले, ह्यावेळी चातुर्गतही जीवथ जास्तच बिलगला होता. चित्रगुप्त कुठेच नसल्याने तो हि अगदी एकाकी आणि अनोळखी पडला होता. कदाचित तिथल्या एका अप्सरेला त्याचा एकाकीपणा जाणवला असेल म्हणूनच कि काय ती त्यांच्याजवळ आली, फुलांचे ताट डाव्या  हातात पेलत उजव्या हाताने तिने जीवथला हळदीचा पट्टा लावला त्याची आरती काढत त्याच्या डोक्यावर तिने फुले वाहिलेतिच्या त्या अनपेक्षित मध्येच येण्याने ब्राम्हणांचे ध्यान विचलित झाले, विषय संपवत ते ब्राम्हण परत त्यांच्या कामाला लागले. चतुर्गत एकटक त्या ब्राम्हणाकडे पाहताच होता तोच   हसण्याच्या आवाजाने तो भानावर आला, ती अप्सरा कितीतरी वेळ त्याच्या डोळ्यात पाहत होती, चातुर्गतने लगेच स्वता:ला सावरले आणि एक हलकेच स्मित देत स्तब्ध उभा राहिला, ती आणखीनही समोरच थांबली होती, त्याला काय करावे सुचत नव्हते. तिच्याकडे पाहण्याचा तो परिपूर्ण प्रयत्न करत होता. पण हलकेच चोरून त्याची नजर वळालीच, तिने हलकेच त्याच्या हाताकडे इशारा केला, त्याने खाले पहिले, ती कितीतरी वेळ हातात फुल घेऊन उभी होतीचतुर्गतने पटकन हात पुढे केला, तिने हलकेच एक मोगराचे फुल त्याच्या हातावर ठेवले आणि  हसत निघून गेली. तिच्या अत्तराचा  सुगंध अजूनही दरवळत होता, त्याने तिला भीतीपोटी नि पाहिलेही नव्हते, उभ्या आयुष्यात तो कधी कुठल्या स्त्रीशी बोललाच नव्हता. इतक्यात एक जाडजुड ब्राम्हण त्याच्याजवळ आला, त्याच्या हातात केळाची दहीभाताची दोन पाने होती, एक पान त्याने चातुर्गाताच्या हातात दिले, श्रीगणेशाचा प्रसाद घ्या गृहण कराचातुर्गतने चटकन ते फुल मानेच्या आत सिंहाच्या कातडीत दडवले आणि हात पुढे केला.  दुसरे पान त्या ब्राम्हणाने स्वता:च्या हाताने जीवथच्या तोंडात दिले, देताना "ओम श्री गणेशाय नमो, हरहर महादेव", असा तो हलकेच पुटपुटलाचतुर्गतनेहि हलकेच ते शब्द उच्चारले, "ओम श्री गणेशाय नमो, हरहर महादेव", आणि तो दहीभात ओठाआड केला, किती थंडपणा होता त्या दही भातात, घशाखालून तो जाताना त्याला एक विशिष्ट चेतनेची जाणीव होत होती, झोपेतून अचानक उठल्यासारखा त्याला भास झाला, त्याचा एक नाही तर हजार मेंदू आहेत अशी त्याला जाणीव झाली, त्याची नजर त्या ब्राम्हणाला शोधत होती, तो दूर महाद्वारावर केळाची फांदी बांधत होता, त्याने पुन्हा पहिले, तो केळाची फांदी बांधत होता आणि त्याच वेळी त्याच्याकडे बघत दहीभातही खात होता, चतुर्गत डोळे फाडून फाडून पाहत होता, केळाच्या घडामधील केळ्या ह्या त्या ब्राम्हणाकडे आपोआप येत होत्या, तो ब्राम्हण अजून हसतच होता. एकाच वेळी तो त्याला वेगवेगळ्या आयामात पाहत  होता, तो त्रीमितीतही होता आणि द्विमितीतही, चातु:र्मितीतही तो होता, आणि चातु:र्मितीत त्याची हत्तीसारखी सोंड दूरदूरवरची केळी तोडून त्याच्या तोंडात सरकावत होती.
हा ब्राम्हण एक हत्ती पण आहे तर..... (चातुर्गत स्वता:शीच पुटपुटत होता )देवलोक रूप बदलतात म्हणजे अक्ष बदलतात त्यांचा जो भाग त्रिमितीय अक्षात असेल तेवढाच भाग मृतजीव पाहू शकतात. 
इतक्यात एक साधारण ब्राम्हण चतुर्गत जवळ आला, 
" देवा, राजसूय यज्ञाचा सौत्रामणी याग आहे हा, उष्णता प्रचंड असेल, तेव्हा थोडे सांभाळून थांब, काळजीच्या स्वरात त्याने मदतीपोटी चातुर्गातला सुचित केले.

"धन्यवाद" चातुर्गाताने नम्रपणे उत्तर दिले.
काही क्षणात तुताऱ्या वाजू लागल्या एकच पळापळ सुरु झाली, पवनदेव, अग्निदेव, वरुणदेव, आपल्या वाहनातून आकाशातून आगमन करीत होते, काही एक मिनिटातच युद्धात ताफा जमा व्हावा त्याप्रमाणे विविध देवदेवता तिथे जमा होत होते .
कुबेराचे दास हे  प्रत्येकाच्या सेवेसाठी अत्यंत तत्पर  होते. पूर्ण बाग हि तर भरलीच होती,काही देवलोक  आकाशातच उभे होते, अगदी शेवटी इंद्रदेवाचे वाहन आले, यज्ञाच्या समोर ब्राम्हणामध्ये इंद्रदेव बसले होते. यज्ञाच्या समोरील आकाश तसेच जमीन खच्चून भरली होती, आणखीनही रथच्या रथ हे येताच होते, एकाकी चातुर्गतची नजर पाठीमागे गेली, यज्ञाच्या मागील बाजूस अगदी चीटपाखरुही नव्हते, त्या बाजूस तो केवळ एकटाच उभा होता, सर्व ब्राम्हण आणि देवलोक हे केवळ त्याच्याकडेच संमुख  होते.
आणि अचानक तो अग्नी देव चतुर्गतच्या पुढ्यात येउन उभा राहिला, पण त्याचे चतुर्गतकडे थोडेही लक्ष्य नव्हते,तो अगदी गंभीर होता, त्या भव्य यज्ञाच्या पायऱ्या चढत तो अग्नीकुंडाजवळ जाऊन उभा राहिला. त्याबरोबर सर्व ब्राम्हण आणि देवलोक हे यज्ञापासून शेकडो मीटर दूर झाले. मंत्राच्या सहाय्याने  ब्राम्हण फळांची आणि साहित्याची रचना हवेतच करीत होते,
शेकडो सामग्री हवेत तरंगत होती आणि विशिष्ट ठिकाणी मांडली जात होती.
इतक्यात अग्निदेवाने स्वता: प्रकट करण्यास सुरुवात केली. त्याचा रंग हा लालसर होत होता, डोळ्यातून निखारे निघत असल्याचा भास होत होता, एक लालबुंद तापलेल्या  सोन्याच्या  मूर्तीप्रमाणे तो भासत होता. त्याच्या अंगाची उष्णता खरोखरच आता भासत होती. आणि इतक्यात एक तेजस्वी रथ पांढरे घोडे उधळीत तेथे हजर झाला. तो एकमेव रथ होता जो चतुर्गातच्या मागच्या दिशेने म्हणजे यज्ञाच्या विरुद्ध दिशेने आला होता. त्या रथासमोर प्रत्येक जन वाकून नमस्कार करत होता, चातुर्गात मात्र एक टक तो दिव्य रथ पाहताच होता.
"देवा, विष्णूदुताचा तो रथ आहे, जिथे मोक्ष मिळतो तेथून आला आहे, देवा नमस्कार करा, फार वेळ नाही थांबणार तो." तोच साधारण ब्राम्हण चातुर्गातला सुचित करत होता.
  चातुर्गाताने वाकून नमस्कार केला. तोच एक एक रूपवान तेजस्वी देवी त्या रथातून बाहेर आली ,तिचा अग्नीकुंडला स्पर्श होताच हवेतली दाह जणू संपुष्टात आला. तो तापलेला अग्निदेवहि थंडावल्या सारखा भासत होता.
 अग्नीकुंडच्या सर्वात जवळ तीच बसली होतीअग्निदेवाने अग्निकुंडात प्रवेश केला, एक जटाधारी साधू हवेतून हवन करत होता, त्याचा आकार हा प्रचंड मोठा होता यापूर्वी त्याला चतुर्गतने पाहिलेले नव्हते. त्याचे डोळे बंद होते, तो ध्यान स्तीतीत होता,  मंत्रध्वनी त्यांचा  ह्रदयातून बाहेर येत होता.ते शब्द चातुर्गातला समजत नव्हते पण त्यांची ताकत तो अनुभूवत होता.
त्या अग्निकुंडात एका सूर्याप्रमाणे तो अग्निदेव चमकत होता, त्याची उष्णता आणि प्रकाश हा सूर्यापेक्षा  किंचितही कमी नव्हता. साधारण मानवाचे तिथे जिवंत राहणे जवळ जवळ अशक्यच होते. चतुर्गत जे काही पाहू शकत होता ते त्याच्या दिव्य दृष्टीमुळेच.
देवी यामिने ओंजळीतून एक फुल त्या अग्निकुंडात अर्पण केले त्या बरोबर धूर आणि वाफेचे मिश्रण त्या अग्निकुंडातून बाहेर फेकले जात  होते, उष्ण तव्यावर पाणी सोडावे त्या प्रमाणे ते दृश्य होते. त्या बरोबर तो अग्निदेव पुर्वरत दिसू लागला. पुन्हा त्या अग्निदेवाने पेट घेण्यास सुरुवात केली, असा तो यज्ञ कितीतरी वेळ चालू होता, वाफ आणि धुराच्च्या मिश्रणात असंख्य अस्त्र शस्त्र आणि तंत्र चतुर्गात पाहत होता. ते असंख्य अयमातून येत होते आणि हे सर्व , तो आणि देवी यामीच पाहू शकत होते.
हळू हळू तो धूर कमी होण्यास सुरुवात झाली अग्निदेव केव्हाच तेथून निघून गेला होता. सुर्य मावळतीला आला होता,संध्याकाळ झालेली होती, यज्ञाच्या गरमीने पूर्ण बगिच्या वाळवांटसारखा भासत होता. ती जमीन विराण होती, देवता लोक हे केव्हाच निघून गेले होते. शुभेच्छा देण्यासारखा तो उत्सवहि नव्हता. धुराकडेच लक्ष्य केंद्रित केल्यामुळे चतुर्गतला बाकी गोष्टींचे भानच राहिले नव्हते,तो तसाही नवा होता त्याला आणखीन बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या.


देवी यामी जीवाथला कुरवाळत दूर उभ्या होत्या.
"त्या कितीवेळापासून तिथे तशाच उभ्या होत्या, कोणी मला हाक का नाही दिली." असंख्य प्रश्न त्याच्या मनात होते.
 माफी तरी कशी मागायची, त्यांची ती पहिलीच भेट आणि कोणी ओळख पण करून दिली नव्हती.
लागलीच चतुर्गत पुढे आला, त्याने लगेच जीवथच्या पाठीवर झेप घेतली आणि त्याच्या मानेजवळ  त्याने त्याचे पाय रोवले.
  देवी यामिला कसे चढवता येईल याचा त्याला भारी तणाव आला होतापण जीवथने सरळ आपल्या कावच्याची मांडणी बदलत एक शिडीच तयार केली , ती अगदी हलक्या पावलाने जीवाथच्या पाठीवर आली, तितक्यात जीवथने मध्यभागी कवचाचे एक कमळच बनवले, त्याच्या  सांगाडा पण बदलत होता. चतुर्गतला हाथ आणि पाय ठेवण्यास तसेच पाठीला आधार हि त्याने तयार केला. जीवथ असे काही करू शकतो हे चतुर्गतला मागच्या एक वर्षात ठाऊक नव्हते. हे खरेच जीवथने केले कि देवी यामिने ह्याचा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला, काही असो पण एक मोठ्या तणावातून त्याला मुक्ती मिळाली.
ती जीवथच्या पाठीवर उभी होती आणि चतुर्गतच्या चालण्याची वाट पाहत होती. चतुर्गत सावध स्थितीत होता आणि  आदेशाची वाट पाहत होता. कदाचित दोघेही नवे होते आणि संभाषण कसे सुरु करायचे हे कदाचित उमजत नव्हते. त्या विराण जागेत फक्त ते तीनच जीव होते, सकाळीच हवीहवीशी वाटणारी ती जागा आता अगदी भयावह वाटत होती.
राहून शेवटी चतुर्गतने उड्डाण घेतले, जायचे तर नरकातच होते हे त्यालाही माहिती होते तरी तो निश्चित आदेशाची वाट पाहत होता.
काही एक क्षणानंतर देवी यामिने प्रथम स्वर बाहेर काढले.
"पितृलोकाकडे चलातो तिचा याम्राज्ञी म्हणून पहिला आदेश होता आणि चतुर्गतशी  साधलेला पहिला संवाद.
"जशी आज्ञा महाराणी " नम्र स्वरात चतुर्गतने उत्तर दिले, आणि पुढल्या क्षणात जीवाथने प्रचंड वेगाने दक्षिणेकडे झेप घेतली.
एकामागून एक अशी अठ्ठावीस नरकाची द्वारे  दुरूनच दिसत होती. मुख्य द्वारात प्रवेश करताच चतुर्गतचा रंग पूर्णपणे बदलला, तो अगदी काळाभोर दिसत होता, पण त्या बरोबरच त्याला एका विशिष्ट शक्तीची जाणीव होत होती. त्याची ताकत कितीतरी पटीने वाढली होतीदोन द्वार मागे पडले होते आणि तिसरा समोर असतानाच यामिने चतुर्गतला थांबण्याची आज्ञा दिली. तो तप्तसुर्मी नरक होता. तिथे बऱ्याच स्त्रियाही  शिक्षा भोगत होत्या. तिचे स्त्रीमन प्रथमच असे काही पाहत होते ,तिचे डोळे विस्पारलेले होते, चतुर्गतने हलकेच जीवथला पुढे लोटले, चातुर्गतचीही हीच गत झाली  होती जेव्हा प्रथम त्याने नरकाचा विस्तार पहिला होता
हळुवारपणे जिवथ पुढे जात होता, एक एक द्वार जवळ येत होते, कधी उजव्या हाताला तर कधी डाव्या हाताला, पितृलोक आता काही दूर नव्हते, तेवढ्यात एक जोरात आरोळी पाठीमागून आली.
"ये चेटकीण, हिम्मत असेल तर हाथ खोल. तू काही देवी नाहीस, एक नीच स्त्री आहेस, जी वासानेपोटी आपल्या भावाशीच लग्न करते, हा हा हा .."
ते  क्रीमिषा नरकाचे द्वार होते आणी एक मांत्रिक अगदी दाराच्या बाहेर येण्याच्या बेतात होता.
पुढच्या क्षणात देवी यामिने तिचा दंड उगारला उजव्या हातात दंड पेलत ती आवाजाचा रोख धरत होती. .
"महाराणी, तो खरा नाही, हे नरक तांत्रिक आणि मांत्रिकाने भरलेले आहे, तुम्ही लक्ष देऊ नका"
चतुर्गतने एक सावधानीचा आदरपूर्वक इशारा दिला.
"आशी  वाक्ये आणि अशे शब्द मी स्वर्गातही ऐकलेले आहेत, फरक एवढाच कि  हे शिक्षेसाठी पात्र  ठरले तर ते नाहीत."देवी यामिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते, पण एक थेंबही तिने डोळ्याबाहेर येऊ दिला नाही.

चतुर्गतला चित्रगुप्ताचे बोल आठवत होते,
" हि कशी काय सामोरी जाईल पिताजी ब्राम्हलाच ठाऊक."

आज प्रथमच पितृलोकाचा दरबार खच्चून  भरला होता, वेगवेगळ्या गृहावरून यमदूत जातीने हजेरी लावत होतेइथून पुढे ते यामिदूत म्हणून ओळखले जाणार होते.
एक एक पाऊल टाकताना यामिचा काळा रंग आणखीनही गडद होत होता. जसे  ती सिंहासनावर विराजमान झाली तसा एकच जयघोष चालू झाला,
"बिलस्वर्गाची  महाराणी देवी यामिचा विजय असो; देवी यामिचा विजय असो.."
आणि पुन्हा शांतता पसरली, जीवथला थोपून चातुर्गात मागून धीम्या पावलाने येतच होता तोच पुन्हा जयघोष झाला,
"बिलस्वर्गाचे मुख्य लेखपाल चिरंजीवी चातुर्गातांचा विजय असो,विजय असो."
कोणीतरी चतुर्गतला  चित्रगुप्ताच्या आसनाकडे बसण्यास आदरपूर्वक सुचवित होते. देवी यामिच्या उजव्या हाताला अगदी सिंहासनाच्या अगदी जवळ तेच एकमेव आसन होते. चित्रगुप्ताची विचारात मग्न असलेली मुद्रा सर्रकन चतुर्गतच्या डोळ्यासमोरून गेली. पुन्हा एकदा देवी यामिला प्रणाम करून चतुर्गत तेवढ्याच शांतपणे त्या आसनावर बसला. देवी यामी पेक्षा जास्त नजर ह्या चातुर्गात्वर खिळल्या होत्या, खुद्द देवी यामी पण विस्परालेल्या नजरेने चतुर्गताकडे पाहत होती.
तो काही देवी देवतांचा पुत्र नव्हता, किंवा कुठल्या श्रेष्ठ साधू अथवा मुनीहि नव्हता. तो एक साधारण मनुष्य होता, एक नश्वर मनुष्य. आजवर कुठलाही मनुष्य त्या स्थानावर कोणीही पहिला नव्हता. स्वत:च्या भविष्याची गोष्ट इथून पुढे तोच लिहिणार होता. तो आता कोणाच्या हातातला बाहुला नव्हता, तो एक स्वतंत्र अस्तित्व असलेला एक महापुरुष होता. इतके असूनही चतुर्गत इतकेच जाणत होता कि तो एक मनुष्य आहे आणि त्याचे भविष्य हे तो त्याच्या  कर्मानेच तयार करणार आहे जो कि तो करत आलेला आहे ,त्यासाठी त्याला कुठल्या कटनीची  आवश्यकता नाही आणि नसणार हि नाही.
...........................................()........................................
(अतिशय चिंताग्रस्त आणि भयावह वातावरणात ब्रम्हलोक तुडुंब भरले होते. ब्रम्हाच्या खालच्या डाव्या बाजूला देवराज इंद्र तर उजव्या बाजूला देवी यमी विराजमान होती.)

ब्रम्हा : " अखेर जे नको होते तेच झाले, मला तर अजूनही विश्वास होत नाही कि सगळेच प्रयत्न एकदाच व्यर्थ जावेत, आता विनाश तर अटळच आहे. फक्त परिणाम कसा कमी करता येईल हेच बघितले पाहिजे.

इंद्र : " ब्रम्हदेव, इतका का जीव रुतला आहे तुमचा त्या पृथ्वीतब्रम्हांडात अजूनही शेकडो  सुंदर गृह आहेत. आणि कधी कधी प्रत्येक गृहाचा अंत तर होतोच, अशा शेकडो पृथ्वी आम्ही पुन्हा निर्माण करू.
सभागृह  : हो हो, आम्ही एकमताने सहमत आहोत, नको तो रोज रोजचा संबधसगळे ब्रम्हांड एकीकडे आणि हि  पृथ्वी एकीकडे असे झाले आहे.
वरुणदेव : "माणसाने चोरवाटा इतक्या काढल्या आहेत कि आम्हालाच कळत नाही कि मूळ रचना कुठली ती."

पवन देव : अहो वरुण देव, तुम्हाला फक्त वरुन पडायचे आहे, इथे मला कुठून कुठून कशे वहावे लागते ते मलाच ठाऊक, काही काचा तर इतक्या पारदर्शक असतात कि डोके फुटेपर्यंत कळत नाही कि काच होती म्हणून.

इंद्र : ब्रम्हाजी, जे होईल ते बघू आपण, पृथ्वी विषयी बरेच वादंग आहे. आणि जे होते ते चांगल्यासाठीच होते.

देवी यामि : "हे इतके हि सोपे नाही."
(देवी यामिच्या त्या पहिल्या वाक्याबरोबर निशब्द शांतता पसरली, प्रत्येकजन फक्त तिच्याकडेच लक्ष्य देत होता, ती काय बोलेल याचे कुतुहूल सर्वांनाच होते.)
"पृथ्वीवर ८४ लाख योनी आहेत त्यात लाख तर मनुष्य जातीच्याच आहेत,सगळ्यांचा एकदमच अंत झाला तर अब्जावधी अतृप्त आत्मा प्रथम नरकात येतील
प्रत्येक आत्म्याला त्याच्या शरीर त्यागानंतर नवीन जीवन प्रदान केले जाते,त्याचा पूर्ण आढावा घेतला जातो, कर्मानुसार शिक्षा आणि असेल तर वरदान दिले जाते, तसेच त्याची जुनी आठवण पुसून टाकण्यात येते, त्याच्या इच्छेचा मान राखून त्याला गुणानुसार नवा जन्म दिला जातो.
अचानक जर असा अकाल उद्भवला तर आम्हास हा भर झेलणार नाही, नरकाचे द्वार भरून ओथम्बुन जाईल, आणि शक्तीकडा तुटली तर सगळ्या आत्मा ब्राम्हंडत सैरभर पसरतील.
आणि  हो इंद्रदेव बहुतेक किंबहुना सर्वच आत्मा प्रथम स्वर्गाकडे धाव घेतील ...कारण त्यांना स्वर्ग फार प्रिय आहे. इंद्रदेव मग देणार का तुम्ही आश्रय त्यांना..
(देवी यामिने तिरका कटाक्ष टाकत जाणीवपूर्वक प्रश्न फेकला.)
इंद्र (खड्बडीने उभे टाकत ): असे कसे, आम्ही असताना पृथ्वीचा अंत मुळीच होऊ देणार नाही, काहीतरी तोडगा निश्चित असला पाहिजे...


To be continue.........

Ref
Bhagavatam 5.26.7 - 5.26.40
Atharvaveda book 12, hymn I & IV.
Mahabharata book 1, section 71.
Mahabharata book 2, section 14.