Sunday 4 August 2019

खडग घेऊनि उभे ठाकले..


खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,
इनायतास फूस लावूनी,
स्वराज्याचे तोरण बांधले,
चाकण जिंकला नरसाळाने,
कोंढाणाही सयास आले,
बिजापूरी चाप लावूनि,
तीर्थरूपी धन्य पावले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,


रांझ्याचे चौरंग केले,
चंद्रावरि मोऱ्यास धाडले,
आई भवानी दुभंग पावली,
विठ्ठलासी कंप जाहला,
अफजलची आतडी मोजले,
अधामाशी अधम वागले
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,




ते तोफांचे बार झाले,
खिंडीत मग प्राण सोडले,
लग्न रयाबाचे सोडोनी,
सिंहगडासी गतप्राण झाले,
सह्याद्रीने असह्य केले,
बारा मावळे दुमदुमले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,


      मृत्यूच्या पालखीत हसत,
शिवा शिवबास धावूनी गेले,
महाराजांचे शब्द न पडती,
ते वेड्या हत्तीस झुंझले,
शिवबाचे ते रूप घेवूनि,
मृत्यू शयावरी स्थिर झोपले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,





                          कोंडाजीने आण भाकली,
साठांनी पन्हाळा जिंकले,
उदक सोडुनि प्राणावरती,
वीर मराठे रणकंदले,
शाहिस्तास शास्त केले,
औरंग्यासि मामा बनविले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,




कारतलब बोळीत गाठला,
सोयीने मुघल ठोकला,
सूरतही थरथर कापली,
बैल घेऊनी पून्हा लुटली,
बहलोलचे पानिपत केले,
सात मराठे वेडात दौडले,
खडग घेऊनि उभे ठाकले,
रणफंदी सह्याद्री मावळे,
रणफंदी सह्याद्री मावळे,

-सेवेस ठाई तत्पर, निखिल अशोक चौंडकर 

1 comment: