Sunday 15 January 2017

।। श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज ।।


“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”


(प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!)




कोण होते हे छत्रपती शिवाजी , कसे होते हे छत्रपती शिवाजी , आकाशातून तारा जमिनीवर पडावा आणि माँसाहेब जिजाऊ ने तो अलगद हातात झेलावा , म्हणतात असे होते हे छत्रपती शिवाजी . स्वराज्य स्थापन करणारे , असे शूरवीर होते हे छत्रपती शिवाजी.


अब्जालखानाचा वध आणि शाहिस्तेखानाची शिकस्त करणारे ,
असे सामर्थ्यवान होते हे छत्रपती शिवाजी.
आग्र्यातील कैदेतून चातुर्याने सुटणारे आणि सिद्धी जौहरच्या वेढ्यातून फुर्तीने निसटणारे,
इंग्रजांना पळवणारे मोघलांना खिळवणारे, पोर्तुगीजांना फाटकावणारे एक श्रेष्ठ योद्धा होते हे छत्रपती शिवाजी .
रयतेचा राजा , धनाढ्य आणि बलाढ्य असे होते माझे छत्रपती शिवाजी .


काय सांगू छत्रपती शिवाजींचे , भरल्या असमांची संपत्ती सोडून , हातात भवानी तलवार झेलत रात्रंदिवस
लढणारे असे होते माझे छत्रपती शिवाजी.




त्यांची शूरता आणि कर्तत्व जसे वज्राप्रमाणे मजबूत होते तशीच त्यांची भावना हि कमलदलाप्रमाणे मृदू होती , अतिशय भावुक होते माझे छत्रपती शिवाजी.


होय रयतेचे दुःख त्यांना बघितली गेली नाहीत आणि उतरले ते युद्धभूमीवर तळपत्या तालवारीनिशी , मावळ्यांना , जुलुमाखाली डांबलेल्यानां , साद देण्यासाठी , त्यांच्या यातनेला हाक देण्यासाठी असे धैर्यशील होते माझे छत्रपती शिवाजी.


अरे आता आम्हाला पूर्णतः आनंदही अनुभवता येत नाहीत त्यांनी दुःख हि इतके आत्मीयतेने काळजात घेतले की जसे काही त्या दुःखावरही त्यांचे प्रेम होते , दुःखातले दुःख जाणायला एक भावना लागते असे भावनाप्रधान होते माझे छत्रपती शिवाजी.


धर्माची पराकाष्टा हि त्याच्या तत्वज्ञानात नाही तर त्याच्या श्रद्धेत असते असे सांगणारे होते आमचे छत्रपती शिवाजी. राज्य आणि धर्मातील भेद जाणणारे एक महान विशारद होते आमचे छत्रपती शिवाजी.
व्यवहाराची गरज राज्यकारभारासाठी असते, धर्मात कधी व्यवहार नसतो , आणि जर तिथे व्यवहार आला तर तो धर्म नव्हे . राज्याला शासन हवे असते तर धर्मला आदर , हे जाणून होते आमचे छत्रपती शिवाजी. काही मूढ लोकांमुळे त्यांनी कधी अनादर नाही केला स्वधर्माचा , आणि कधी नाही अनादर केला अन्य धर्मांचा , धर्माची मूल्ये हि तर भावना प्रधान असतात त्यात स्वार्थ नसतो , मानवतेचा आदर करणारे सर्वधर्म समभाव राखणारे असे सर्वांचे होते छत्रपती शिवाजी.


प्रत्येक हृदयाची स्पंदन ऐकणारे सुहृदयी असे सर्वांचे होते छत्रपती शिवाजी, प्रेमाचा सागर होते हे छत्रपती शिवाजी , नित्य प्रेमाचा पुतळा होते हे छत्रपती शिवाजी , कशाचाही स्वार्थ न बाळगता विरक्त भावनेने धर्म निभावणारे वीर वैरागी होते हे छत्रपती शिवाजी .
मनुष्यातील सुंदरता पाहणारे होते हे छत्रपती शिवाजी , सर्वांचे भले इच्छिणारे दयावान , शांतताप्रिय , असे सर्वांचे होते छत्रपती शिवाजी .




पिळवटून टाकणारे ते क्रूर अन्याय , रयतेवर होणारे ते निर्दयी अत्याचार , हे पाहून असह्य वेदनांनी कळवळणारे जिवंत हृदयाचे रयतेचे राजे होते छत्रपती शिवाजी, आणि त्याच असह्य वेदनेने भवानी उगारणारे विनाशकारी असे छत्रपती होते छत्रपती शिवाजी. रयतेच्या यातनेने तडफ़डलेले, रणभूमीला स्मशानभूमी बनवणारे असे रुद्र होते हे छत्रपती शिवाजी.
साधूंना सरंक्षण देणारे , आणि राक्षसांना मृत्यू , असे धर्मनिरपेक्ष सर्वांचे होते हे छत्रपती शिवाजी, असे सर्वांचे होते हे छत्रपती शिवाजी.
"श्रीमंत राजाधिराज , सह्याद्रीपुत्र, जिजाऊनंदन ,रुद्राक्ष अलंकृत, व्याघ्र नखांकित, अश्वरूढ , भवानी धारक ,
स्वराज्य संस्थापक , श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय....!"