Saturday 30 May 2015

आभास


सकाळचा प्रकाश आणि संध्याकाळचा आकाश,
एकच असते ,
मग फरक का तुला वाटतो,
माझे ऐक, हा अभासच तुला फसवतो.

हे माझ्या मना, अभासाला फसू नकोस,
तुला दुखातही झोप येत नाही,
आनंदाच्या रात्रीही तू जागून काढतोस,
दोन्ही वेळेस तुझे डोळे उघडेच,
मग फरक का तुला वाटतो,
माझे ऐक हा अभासच तुला फसवतो.


 प्रत्येक गोष्टीचे निम्मीत शोधतोस,
आणि तेच खरे  असे वाटून घेतोस,
तुला समजते खरे काही वेगळेच आहे,
मग का स्वताला आभासात फसवून घेतोस .

कामात असतना बागेत रामातोस,
आणि बागेत गेलास कि काम आठवतोस.
तू नक्को संग असे का करतोस,
माझे ऐक हा अभासच तुला फसवतो.

आभास तुला फसवतो
असाही तुला आभास होतो
मग सत्य शोधत बसण्याच्या
एका नव्या अभासाला तू फसतोस.


कटू सत्य तुला कळते,
त्याला मात्र तू आभास समजतोस,
आणि आभास मला कळतो,
ह्या अजब अभासाला तू फसतोस.

हे सत्यच एक आभास आहे,
आणि हा अभासच एक सत्य आहे
हे जीवन एक आभास आहे
खरे काहीच नाही
हे मरणही एक आभास आहे....

हे मरणही एक आभास आहे...

Email Adress : mundkargajanan756@gmail.com

No comments:

Post a Comment