सप्टेंबर २००६
शिक्षक
शिक्षक तरी कोण असतो,
शिक्षक फक्त माणूस नसतो,
शिक्षक एक ठिणगी असतो,
जो प्रंचंड ज्वालामुखी पेटवू शकतो.
शिक्षिका असते,
जी जगण्याची रीत त्याला शिकवते,
त्याच बाळाचे वडील त्याचे,
शिक्षक असतात,
जो जगण्याची ताकत कमवायला शिकवतो.
शाळेत कॉलेजमधे तर शिक्षकच शिक्षक असतो,
काळात न कळत तो जगण्याची रीत शिकवतो,
कळत न कळत तो भावी समाजाला सुधारतो.
ज्याचा कोणीच शिक्षक नसतो,
ग्रंथच त्याचा शिक्षक असतो.
यशाचा शिक्षक अपयश असतो,
खऱ्या माणसाचा योग्य विचार,
हाच त्याच्या चुकांचा शिक्षक असतो
Email Adress : mundkargajanan756@gmail.com





No comments:
Post a Comment