Showing posts with label kvm. Show all posts
Showing posts with label kvm. Show all posts

Saturday, 30 May 2015

आभास


सकाळचा प्रकाश आणि संध्याकाळचा आकाश,
एकच असते ,
मग फरक का तुला वाटतो,
माझे ऐक, हा अभासच तुला फसवतो.

हे माझ्या मना, अभासाला फसू नकोस,
तुला दुखातही झोप येत नाही,
आनंदाच्या रात्रीही तू जागून काढतोस,
दोन्ही वेळेस तुझे डोळे उघडेच,
मग फरक का तुला वाटतो,
माझे ऐक हा अभासच तुला फसवतो.


 प्रत्येक गोष्टीचे निम्मीत शोधतोस,
आणि तेच खरे  असे वाटून घेतोस,
तुला समजते खरे काही वेगळेच आहे,
मग का स्वताला आभासात फसवून घेतोस .

कामात असतना बागेत रामातोस,
आणि बागेत गेलास कि काम आठवतोस.
तू नक्को संग असे का करतोस,
माझे ऐक हा अभासच तुला फसवतो.

आभास तुला फसवतो
असाही तुला आभास होतो
मग सत्य शोधत बसण्याच्या
एका नव्या अभासाला तू फसतोस.


कटू सत्य तुला कळते,
त्याला मात्र तू आभास समजतोस,
आणि आभास मला कळतो,
ह्या अजब अभासाला तू फसतोस.

हे सत्यच एक आभास आहे,
आणि हा अभासच एक सत्य आहे
हे जीवन एक आभास आहे
खरे काहीच नाही
हे मरणही एक आभास आहे....

हे मरणही एक आभास आहे...

Email Adress : mundkargajanan756@gmail.com

Friday, 29 May 2015

मराठी कविता_पाऊस

सप्टेंबर  २००३ 
पाऊस
पाऊसपाऊस म्हणजे नेमके काय आहे तरी,
थेंबाच वर्षावचमकणारी वीज,कोसळणाऱ्या सरी,
कि बेधुंद होऊन वाहणारे वारे सुसाट.

कदाचित...
कदाचित पाऊस म्हणजे,
जमिनीला वाटलेले आकाशाचे अप्रूप,
किंवा आकाशाला भाळलेले ते जमिनीचे रूप.

खरेच तापलेल्या जमिनीच्या,
वेदनेच्या कळवळीने,
येतो तो झपाटल्यासारखा,
जमिनीच्या ओढीने.

तिच्या त्या रख-रखत्या अंगाकडे पाहून,
पाहून तिच्या कोरड्या डोळ्याकडे,
अतिशय प्रंचंड गर्जना करून,
येतो तो थेंबाच्या रूपाने तिच्याकडे.

मग तीही हळूहळू थंडावत जाते,
त्याच्या त्या स्पर्शाने,
अन मृद्गंध निर्माण होतो,
ह्या अनोख्या भेटीने.

नव्या वाधुसारखे पांघरतो,
तो तिला हिरव्या शालुने,
भरतो  तिचे कोरडे डोळे,
त्याच्या ओल्या आसवाने.

खळाळत वाहतात आनंदाने,
आसंव तिच्या असंख्य डोळ्याताने,
अन पुन्हा एकदा जगू लागते,
तिच्या आसंवावरचे  जीवन आनंदाने.
 
पाऊस वर नाहीपाऊस पाणी नाही,
पाऊस ऋतू नाहीपाऊस नाही पाऊस.
आकाश अन जमिनीतले
एक निखळ प्रेम आहे पाऊस


एक निखळ प्रेम आहे पाऊस.










मराठी कविता_शिक्षक

सप्टेंबर २००६

शिक्षक
शिक्षक तरी कोण असतो,
शिक्षक फक्त माणूस नसतो,
शिक्षक एक ठिणगी असतो,
जो प्रंचंड ज्वालामुखी पेटवू शकतो.

लहान बाळाची आईच त्याची,
शिक्षिका असते,
जी जगण्याची रीत त्याला शिकवते,
त्याच बाळाचे वडील त्याचे,
शिक्षक असतात,
जो जगण्याची ताकत कमवायला शिकवतो.

शाळेत कॉलेजमधे तर शिक्षकच शिक्षक असतो,
काळात  कळत तो जगण्याची रीत शिकवतो,
कळत  कळत तो भावी समाजाला सुधारतो.

ज्याचा कोणीच शिक्षक नसतो,
जो एकलव्यासारखा असतो.
ग्रंथच त्याचा शिक्षक असतो.

यशाचा शिक्षक अपयश असतो,
खऱ्या माणसाचा योग्य विचार,

हाच त्याच्या चुकांचा शिक्षक असतो
Email Adress : mundkargajanan756@gmail.com