Friday 29 May 2015

मराठी कविता_पाऊस

सप्टेंबर  २००३ 
पाऊस
पाऊसपाऊस म्हणजे नेमके काय आहे तरी,
थेंबाच वर्षावचमकणारी वीज,कोसळणाऱ्या सरी,
कि बेधुंद होऊन वाहणारे वारे सुसाट.

कदाचित...
कदाचित पाऊस म्हणजे,
जमिनीला वाटलेले आकाशाचे अप्रूप,
किंवा आकाशाला भाळलेले ते जमिनीचे रूप.

खरेच तापलेल्या जमिनीच्या,
वेदनेच्या कळवळीने,
येतो तो झपाटल्यासारखा,
जमिनीच्या ओढीने.

तिच्या त्या रख-रखत्या अंगाकडे पाहून,
पाहून तिच्या कोरड्या डोळ्याकडे,
अतिशय प्रंचंड गर्जना करून,
येतो तो थेंबाच्या रूपाने तिच्याकडे.

मग तीही हळूहळू थंडावत जाते,
त्याच्या त्या स्पर्शाने,
अन मृद्गंध निर्माण होतो,
ह्या अनोख्या भेटीने.

नव्या वाधुसारखे पांघरतो,
तो तिला हिरव्या शालुने,
भरतो  तिचे कोरडे डोळे,
त्याच्या ओल्या आसवाने.

खळाळत वाहतात आनंदाने,
आसंव तिच्या असंख्य डोळ्याताने,
अन पुन्हा एकदा जगू लागते,
तिच्या आसंवावरचे  जीवन आनंदाने.
 
पाऊस वर नाहीपाऊस पाणी नाही,
पाऊस ऋतू नाहीपाऊस नाही पाऊस.
आकाश अन जमिनीतले
एक निखळ प्रेम आहे पाऊस


एक निखळ प्रेम आहे पाऊस.










No comments:

Post a Comment