Friday 29 May 2015

मराठी कविता_चांदण्या







ऑगस्ट २००५


चांदण्या


जर ह्या चांदण्या नसल्या असत्या तर .......






जर ह्या चांदण्या नसल्या असत्या तर,


किती भकास वाटले असते हे आकाश.


ह्या चांदण्याविना ,


हि पृथ्वीच झाली असती निराश.






किती जपून चालतात ह्या चांदण्या सावकाश,


जसे काही ओढतात ह्या, प्रत्येक मनाच्या भावनेची कास.


कधी वाटते कि ह्याच जाणतात,


माझा प्रत्येक गुंतलेला श्वास.






मी राहीन न राहीन,


पण ह्या चांदण्या देतील माझी साक्ष.


नाहीतर मी हि होईन असाच एक तर खास,


ज्याला नाही कोणता अंत अन, नाही कोणता त्रास ,






बघेन हि सुंदर सृष्टी,


तसेच बघेन तिचा तो विकृत ऱ्हास.


पण करू शकणार नाही काही,


शेवटी मी त्या निर्मिकाचाच दास.






तर असो वा मानव निर्जीव असो वा सजीव,


सर्वांच्याच गळ्यात आहे मरणाचा फास.


ह्या समीकरणाला नसेल कुणाचीच साक्ष,


कारण शेवटी ह्या ब्रम्हांडचाही आहे अटळ विनाश.


ह्या ब्रम्हांडचाही आहे अटळ विनाश .

























No comments:

Post a Comment