Friday 9 March 2018

कथा- एका रहस्यमयी वेताळाची




हे दुःखा माझ्या  बांधवा  SSS
ओळखू  शकलो  नाही  तुला,  माफी  रे  मागतो  तुझी ,
सुखाच्या  त्या  शोधात  मी असतानाही , तू  पाठ  सोडली  नाहीस माझी .

जीवनभर   साथ  निभावत आलास तू माझा -
कसा  रे  मी  इतका  ठायी  जाहलो ,
आनंदाचा  मंत्र  शोधण्यामागे  तुला  विसरून  गेलो .

आयुष्याचा   साथी  तू  माझा,  का  म्हणून  तुझे  प्रेम  मला  समझले  नाही .
यातनांची ती तुझी भेट का म्हणून मी स्वीकारली नाही.

नको  रे  तो  स्वर्गाचा  अट्टाहास  मला  आता ,
नको  ती मुक्ती नि  नको कोणी एक  धाम  मला -
वैतरणेच्या काठावर तू असाच राहा सोबती मला.

जीवनभर  साथ  निभावणारा,  हे  दुःखा कसा  काय  मी  तुला  झिडकारू,
अंतःकरणात  एवढा  खोलवर  रुतलेला  तू , का  म्हणून  मी  तुला विसरू ?

वाट्टेल  ते  बोलू  दे  जग, प्रत्येक  क्षणाला   तू  सोबत  होतास  माझ्या,
पण सुखाच्या त्या हव्यासापायी मी नेहमी तिरस्कार केला तुझा.

चल  सोडला  तो  स्वर्गाचा  अट्टाहास ,
अन  सोडला  तो  मुक्तीचा  ध्यास .

तूच  बरोबर  राहीन  मी  नरकात  आता ,
अन  भोगेल  मी  तो  आनंदमयी  त्रास .

चल   मिळून  राहू  या  तू  आणि  मी  असे ,
कि  इंद्राला  वाटेल  कि  स्वर्ग   सोडून   यावे  इथे.

हे शब्द आहेत  असे,
ना भूतो ना  भविष्यती  जसे.

जणू काही लिहीत आहे  भूत  दुसरे,
एका साध्या मनुष्याच्या  हस्ते.

अलोका तूच अभय दे आता, माझा  खरा अभयदाता तूच,
विष  प्राशन केलास माझा खरा वैरागी तूच.

यक्षा नमो  नमो  तुला  ह्या  वेताळाचा,
वचन दे मला ,असेच मी आजन्म भूत राहण्याचा.
वरदान नको, मंत्र दे मला - ह्या अद्भुत  रहस्याचा,
कि युगान युगे  कथा सांगितल्या जातील माझ्या अशा,
जशा एका रहस्यमयी वेताळाच्या