Wednesday 16 June 2021

संध्याकाळ (लॉकडाऊन नंतरची 2021) - 3 (#SarangaDariya)

 



१५ जुनाची संध्याकाळ, आज इव्हनिंग वॉक घेणे शक्य नव्हते. बराच रात्री उशिरापर्यंत काम करत बसलो होतो. रात्री अकरा नंतर काम  करायचे म्हणजे काहीतरी म्युजिक आणि स्नॅक्स एकदम मूड बनवणारे. नेहमीप्रमाणे अकाउस्टीक म्युजिक ऐकण्याचा आनंद घेत होतो. झोमॅटो वरून काहीतरी मागवण्याची इच्छा झाली. "कर्फ्यू  हॅज बिगन" असा मेसेज दिसला. घरात काही बनवायची इच्छा नव्हती. उगाच फ्रीझ उघडून पहिला, गाजर आणि काकडी बरीच होती, प्लेट मध्ये सलाड बनवून जागेवर पुन्हा लॅपटॉप समोर बसलो. 

बऱ्याच दिवसापासून आरिआना ग्रांडेचे गाणी ऐकली नव्हती. सॅम आणि कॅट ह्या मालिकेमध्ये एकदम गोंडस आणि निरागस दिसणारी ती आता बरीच हाय फाय झाली होती. तिचा क्युटनेस हा अजूनही ओव्हरलोड होता.युट्युब मिनीमाइज करून कामामध्ये गुंतलो. पूर्वी युट्युब मिनीमाइज केला कि गाणी पण बंद होत होती, बघायचे नसेल तर ऐकायचे पण नाही असे धोरण युट्युबने बदललेलं होतं. बऱ्याच गोष्टीही बदललेल्या होत्या. तुमच्या आवडी जपून नवा काय ते ट्रेंड चालू आहे, हे युट्युब एकामागून  एक दाखवत होते. ऑटोप्ले ऑन करून मी कामात गुंतून गेलो.  १० एक नेहमीची  गाणी झाली असतील ऐकून, कामात एव्हाना बराच गुंतलो होतो. एकदमच बासरीची धून कानावर पडली. फारच मधुर होती ती. गाणं हळू हळू जोर धरत होतं, साऊथ चा गाणं होतं ते. काही एक शब्द कळत नव्हता. पण गाणं असं काही थिरकत होतं कि, जणू कैक दिवसापासून कोरड्या पडलेल्या धबधब्यातून जोरदार पांढरंशुभ्र फेसाळ पाणी ओसंडून वाहत आहे. गाणं मध्यावर आले,तसे माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती. शेवटी ना राहवून मी गाणं ओपन केलंच. अगदी धुंद होऊन थिरकणारी ती नजरेस पडली. इतकी ऊर्जा त्या गाण्यामध्ये होती जणूं शब्दच आठवणे बंद  झाले होते. सध्या फॅशन च्या ट्रेंड मध्ये, हे एकदम, अगदी गावातल्या भारतीय वेशभूषा आणि राहणीमान ह्या चाकोरीत बनवलेले ,अस्सल देशी पद्धतीचे गाणे हृदयाला आरपार शिरून जाईल असे कधीच वाटले नव्हते. बाहुबली नंतर साऊथ ने पुन्हा एकदा स्वतःच्या कल्पकतेला सिद्ध केले होते. हे गाणे एक उच्च पातळीच्या शैलीचे स्वतःमध्येच एक उदाहरण होते.पुन्हा रिप्ले केला, एकदा दोनदा पहिला, पण तो भेभान नाच, तो मुक्तछंद भाव काही केल्या उमजत नव्हता. लॉकडाऊन  नंतर खरंच अशा सुरुवातीची गरज होती. लोंकांमध्ये एक नवीन उमंग भरेल असे ते गाणे होते. कुठल्याही एक प्रकारच्या बंधनाची पर्वा न करता ती  भेभान नाचत होती. हा खरे तर कळसच होता. तिच्या थिरकणाऱ्या पायांनी शकिरा आणि नोरालाही केव्हाच पछाडून लावले होते. अतिशय खुल्या मनाने मुक्तरंग ती उधळत होती. जसेकाही तिच्या हृदयाची सारेच दरवाजे तिने उघडलेले होते. तिची ती मुक्त आनंदाची उधळण दूर दूरवर जणू गर्दीत पसरत होती. तिचे ते भाव आणि स्टेप्स अगदी अगदी नॅच्युरल होते.रिदम आणि  बिट्स ची जणू  तिला पर्वा नव्हती. सैरा बानू पासून ते श्रद्धा कपूर पर्यंत, आजपर्यंत बॉलीवूड मध्ये अशा प्रकारचा डान्स आणि भाव मी तरी नाही पहिला. बाकी कोणाला उमगले असेल कि नाही पण तिने बेस्ट ऑफ दि बेस्ट परफॉर्मन्स दिला होता. अर्थार्थ कॉम्पोसर आणि कोरियो ग्राफर यांची सुद्धा काम हे कौतुकास्पद होते. #sarangdariya असा हॅशटॅग हि दिसला. पण ती कोण होती ते मात्र ठाऊक नव्हते. स्टेटस ठेवण्यापलीकडे मी काही आणखीन कौतुक करू शकत नव्हतो.  पुढच्या अर्ध्या एक तासात राहिलेले काम  आटोपले, आणि तसाच बेड वर पहुडलो. गाण्याचे ते काही शब्द ( आधी रमते राधुरा सेलिया.., दाणी पेरे सारंगा दारिया  ..) हे अजूनही कानात घुमत होते. आज शांत झोप लागणार हे निश्चित.

सकाळी जाग आली अगदी फ्रेश सकाळ होती. फोन चेक केला बरेच रिप्लाय होते. एका जर्मन मित्राचा  माईंड ब्लोविंग असा रिप्लाय आला होता, चेन्नईच्या एका मित्रानेहि रिप्लाय केला " गजानन, धिस इस कोलीवूड सॉंग & हर नेम इस  "साई पल्लवी" 

३-४ महिन्यापूर्वी रिलीस झालेल्या ह्या गाण्याचे 200M च्या वरती views क्रॉस झाले होते. आणि अजूनही ते सोशल मीडिया वर धिंगाणा घालत होते.

.. must watch 


https://www.youtube.com/watch?v=9XYEF-2gxfw

#SarangaDariyaFullVideoSong​ #Mangli #SaiPallavi​

watch here

गजानन मुंडकर (पुणे )



No comments:

Post a Comment